रविवारला बाबा जूमदेवजी
ग्रामस्वच्छता अभियान
बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नगरपंचायत, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दी. २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता मोहाडी शहरात महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेची सुरूवात बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन येथून होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत अध्यक्षा छाया डेकाटे यांच्या हस्ते होणार असून प्रमूक अथीती म्हणून मुख्याधिकारी सौध्दर्ग्य मेश्राम, प्रा. सुषमा पांडे, जी. प. सदस्य नरेश ईश्वरकर, देवेन्द्र ईलमे, सिराज शेख यशवंत थोटे, नगरसेविका रेखा हेडाऊ, वदना पराते, देवश्री शहारे, नगरसेवक ज्योतिष नंदनवार, पवन चव्हाण, उपाध्यक्ष सचिन गायधने नगरसेविका मनीषा गायधने नगरसेवक हेमचंद पराते, महेश नीमजे, नगरसेविका पूनम धकाते, नगरसेवक यादव कुंभारे, नगरसेविका अश्विनी डेकाटे, दिशा निमकर, सुमन मेहर, सविता साठवणे, नगरसेवक शैलेश गभणे, स्वीकृत सदस्य लाला तरारे सेवक चिंधालोरे उपस्थीत राहणार आहेत. कार्यक्रमाला सेवकानी उपस्थित राहण्याचे आवाहन बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या संचालकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा