त्यागाच्या दिवसात पाळण्याचे बंधन
(१) मांसाहार करु नये.
(२) ब्रम्हचर्य व्रत पाळावे.
(३) औषधोपचार करु नये.
(फोड आले तरी मलम लावू नये परंतू पोलीओ डोज देता येते.)
(४) बाहेर कुठेही कोणाच्याही घरी किंवा हाताचे खाऊ नये.
(५) कोणत्याही घरी पाणी पिऊ नये. विहीरीवर किंवा नळावर स्वतःच्या हाताने पाणी घेऊन प्यावे.
(६) तळलेली किंवा भाजलेली वस्तू खाऊ नये.
(उदा. मुरमुरे, चने, पोहे, बिस्कीट इ.)
(७) फक्त फळे खाता येतात.
(८) दूध किंवा दही घेता येईल. कारण त्या पवित्र वस्तू आहेत. पण दुसर्याच्या घरचे गरम केलेले दुध चालणार नाही.
(९) कोणत्याही प्रकारचे उसनवार घेऊ नये. त्यागाचे कार्य पुर्ण झाल्यावर त्या सेवकांकडे वरील बंधनाची पुर्ण खात्री करून घ्यावी. खात्री पटल्यावरच त्यांना फोटो करिता मोहाडीला आणावे. अन्यथा आणू नये. कार्य सुरु असतांना त्याग भंग केला असेल तर कार्य बंद करावे आणि वरील बंधन पुन्हा एकदा समजावून घ्यावे. त्याचे पालन करु शकत असल्यास ११ दिवसाचे साधे कार्य द्यावे. अन्यथा कार्य देवू नये.
(१०) हवनकार्यात जातांनी मांसाहार करुन जाऊ नये. हवनातून परत आल्यानंतरही मांसाहार करु नये.
(११) कार्य देणारा सेवक बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पूर्णतः स्वतः आचरण करित असेल तरच त्या सेवकाने मार्गदर्शन करावे. अन्यथा करु नये. कारण भगवंत जागृत आहे. स्वतः आचरण न करता मार्गदर्शन केले तर स्वतःचे जीवन धोक्यात येऊ शकते.
(१२) प्रत्येक गावात चारित्रवान अशा एकाच व्यक्तिला कार्य देण्याचे अधिकार देण्यात यावे. वाद असल्यास मठाधिपतींना भेटून व्यक्ती ठरवावी.
(१३) नवीन सेवकाला कार्य देणाऱ्या सेवकांनी नवीन सेवकाचे कार्य पूर्ण झाल्याशिवाय (हवनकार्य) त्याच्याकडे काहीही घेवू नये. हवन कार्य झाल्यानंतर चहा, पाणी, सुपारी, भोजन घेता येईल. निष्काम भावनेने कार्य द्याव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा