मार्गाचे उद्देश
भगवंताची प्राप्ती करुन वाईट विचारांचा, वाईट भावनेचा नाश होतो. असा बाबांचा आणि सेवकांचा आत्मानुभव आहे. म्हणून या मार्गाकडे लोकांची धाव आहे. मार्गामुळे निश्चितच दुष्ट भावनेचा आणि अंधश्रद्धेचा नाश होते. जीवनातील अनेक पूजा बंद करुन मनाची एकाग्रता, एकचित्त, एकलक्ष, एक भगवान आहे. असे बाबांनी सिद्ध केले आहे. काही स्वार्थी लोकांनी मानवाच्या मनात शंकाकुशंका निर्माण करुन लोकांच्या मनात भिन्न-भिन्न विचार निर्माण केले आहेत. त्या कारणाने आत्मशक्ती आणि आत्मबल कमजोर झाले आहे. म्हणून मानवी जीवनात मनाची एकाग्रता हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये तयार होतो व तोच आत्मप्रचिती देतो. आत्मशक्ती वाढते, शंकाकुशंका नष्ट होतात आणि भगवंत जवळ राहतो. मानव आपले भविष्य उज्वल करतो, असा मानवाला साक्षात्कार मिळतो, यामुळे या मार्गात जास्तीत-जास्त वाढ होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा