मार्गात येणाऱ्या महारोग्यांकरिता नियम
मार्गात येणाऱ्या महारोगी, कोड असलेल्या लोकांनी प्रथम फोटो काढुन तो ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या भवनात आणून द्यावा. नंतर मार्ग देणार्याने त्यास मार्गदर्शन करावे. मार्गात आल्यावर त्याची पुर्ण सुधारणा झाल्यानंतर फोटो काढून आणून द्यावा. त्यानंतर ४१ दिवसाचे त्यागाचे कार्य द्यावे. महारोगी, कोड किंवा लखवा असलेल्या लोकांना साध्या कार्यात सुद्धा खालील बंधने द्यावीत.
(अ) मांसाहार करु नये.
(ब) ब्रम्हचर्य व्रत पालन करावे.
(क) तळलेले पदार्थ खाऊ नये.
(ड) राग आणू नये.
जो पर्यंत पुर्णपणे सुधारणा होत नाही तो पर्यंत तीन महिने, सहा महिने, सव्वा वर्षापर्यंतचे वरील बंधनाचे कार्य द्यावे. पुर्ण सुधारणा झाल्याशिवाय पक्के कार्य देवू नये, परिस्थिती पाहन मार्गदर्शन करावे. ३ ते ५ वर्षापर्यंत कार्य देत जावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा