🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक"
दिनांक : १२ ऑक्टोबर २०१८ शुक्रवार
【 चर्चा बैठकीचे विषय 】
⏩ बाबानी आपल्याला "प्रेमाने वागणे" शब्द दिले आहे या शब्दाचा अर्थ काय आहे ❓ ⏪
【 विचार क्रमांक १ 】
विषय :- ✍ बाबानी आपल्याला ३ शब्द दिले आहेत त्यापैकी ३ रा शब्द "प्रेमाणे वागणे" या शब्दचा अर्थ काय आहे❓
उत्तर:-
♦प्रेम हा शब्द मात्र फक्त अडीच अक्षरांचा आहे पण याचात खूप ताकत आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी हयाती मध्ये असतांनी यांचा दवरा धोप या गावी आलेला होता व त्या ठिकाणी बाबानी आपल्या सेवकांना भिक्षा मागितली होती तर ती फक्त सत्य, मर्यादा व प्रेमाची. आता पण महानत्यागी बाबा जुमदेवजी आत्मबोलातून सुद्धा भिक्षा मागत असतात. पण आपण सेवक तेही सुद्धा देऊ शकत नाही.
♦सेवकांनी सर्वांन सोबत प्रेमानेच वागायला पाहिजे. व आपल्या कुटुंबामध्ये नेहमी प्रेमाचेच आचरण ठेऊन कोणतेही कार्य करायल पाहिजे. प्रेमाचे पण प्रकार आहेत पण जे प्रेम आपल्याला चांगले वाटते तेच प्रेम आपण आपल्या आचरणात आणायला पाहिजेत. जैसी रीत प्रेम से वैसी प्रीत हराम से होय, जो चला जाये वैकुंठ पला न पकडे कोई म्हणून नेहमी प्रेम वाटा. प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे. आपल्या मनात सर्वांन विषयी प्रेम असणे गरजेचे आहे. कारण तिथे काद्धीच राग येत नाही. जिथे राग येतो तिथे प्रेम नाही येत, आणि जिथे प्रेम येतो तिथे राग येत नाही.
♦महणून म्हटले आहे की- ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय.
सेवक : कौशिक कनोजे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक २ 】
♦ आजच्या चर्चा बैठकीचे विषयावर विचार देण्याचा प्रयत्न करत आहे
♦ बाबांनी भगवत गुणाचे तीन शब्द दिले आहेत
♦ अपल्या कुटुंबात आणि सेवकात
♦ तिसरा शब्द
3)प्रेमाने वागणे
✍ महानत्यागी बाबा जुमदेवजीनी भगवत कुपाची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती,प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गात सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत होते.या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत होते आणि मार्गदर्शन करीत होते ,प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत होते,याचे निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आनन्याकरीता त्यांच्या कुटुंबात आचरनात आनन्याकरीता तीन शब्द दिलेले आहेत,
१) सत्य बोलणे
२) मर्यादा पाळने
३) प्रेमाने वागने
♦ 'शब्द' भगवान आहे ,शब्द हेच सैतान आहे,सेवकाचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत,फोटो देताना ते सेवकाना सांगत होते की,कुटुंबात व सेवकात सत्य,मर्यादा व प्रेमाने वागावे आणि त्याबद्दल त्यांचेकडून तसेच वचन घेत होते ,याबरोबर वाईटाचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत,
३) प्रेमाने वागने
♦ सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वाबरोबर प्रेमाने वागले पाहिजे कोणावरही रागाऊ नये,कुणी चुकले तर त्याला समजावुन सांगावे,लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पन रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते,जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादाभंग होतो,प्रेम हा भगवंताला आवडनारा प्रथम गुण आहे,प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असावयास पाहिजे.म्हणून म्हटले आहे,ढाई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होय
♦ ज्या कुटुंबात सत्य,आणि मर्यादा आहे त्या कुटुंबात प्रेम हा असतो आणि तो पूर्ण कुटुंब प्रेमाने कार्य करत असतो प्रेम हा शब्द फक्त अडीच अक्षर दिसतो परंतु हा शब्द एखाद्या गोट्याला सुद्धा पाझर फोडू शकतो,जर प्रत्येक मानव प्रेमाने वागला तर मानवात होणारा रागाचा राक्षस नष्ट होऊन फक्त प्रेम पूर्वक भगवंताचे गुण त्या कुटुंबात राहील म्हणून या मार्गात भगवंत गुणांचे तीन शब्द पाळले तर खरोखर आपले जीवन सफल होईल हे निश्चित आहे.
👆वरील प्रेमाने वागणे सेवकांनी आचरनात आणली आणि पालन केले तर निश्चित आपला घर आणि आपला परिसर स्वर्ग बनु सकतो करीता बाबानी दिलेल्या तीन शब्दाचा पालन करावा
♦ माझ्या लिहण्यात काही चुकभुल झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला व महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो. आणि वाराणसी आईला माफी मागतो. आणि सर्व सेवक दादा आणि सेविका ताईला माफी मागतो.*
परमात्मा एक सेवक
सेवक : कृणाल शेंडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ३ 】
♦विषय: प्रेमाणे वागणे
♦ या विषया वर माझ विचार देत आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर बाबा आपल्या निवास्थानी प्रत्येक शनीवारला सायंकाळी निराकार बैठक होत होती आणी बैठकित प्रथम कुटुंबातिल लोक व जस जसे सेवक वाढत गेले तसे सेवक उपस्थीत राहत होते आणि बैठकित बाबा जुमदेवजी निराकार अवस्थेत येत आणि सर्व सेवकांना मार्गदर्शन करत मानवाचे जिवन सुखमय जगण्या करिता आपल्या कुटुंबात तिन शब्द आचरणात आणायला पाहिजे
त्यात ३) शब्द प्रेमाणे वागणे
♦ सेवकांनी आपल्या कटुंबात लहान असो की मोठा सर्वा बरोबर प्रेमाणे वागले पाहिजे कुणावर ही रागावू नये कुनी चूकले तर त्यांना समजावुन सांगितले पाहिजे आपल्या कटुंबात लहान मुल असले आणी त्यांच्या हातुन काही चुक झाली असेल तरी त्यांना प्रेमाण समजावून सांगितल तर त्यांना लवकर कळते आणी आपन रागावल तर ते घाबरतात आणी त्यांच्या आत्मबल कमी होत असतेआणि मर्यादा भंग होते आणि हे भगवंताला मान्य नसते प्रेम हां भगवंताला आवडणारा प्रथम गुन आहे प्रतेक सेवकाच्या मणात प्रतेका विषयी प्रेम असायला पाहीजे प्रेम हा परमेस्वराला आवडणारा शब्द आहे
सेवक : उमेश बुधे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ४ 】
♦ सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वा बरोबर प्रेमाने वागले पाहीजे कुणावरही रागावू नये कुणी चुकले तर त्याला समजाऊन सांगावे लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते जर रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते जेणेकरून तो घाबरतो आणी त्यामुळे मर्यादा भंग होते प्रेम हा भगवंताला आवडणार प्रथम गुण आहे प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असायला पाहिजे म्हणुन म्हटले आहे धाई अक्षर प्रेम ka पढ़ें सो पंडीत होय
नमस्कारजी
सेवक : अशोक कडव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ५ 】
♦ बाबांनी भगवंत गुणांचे ३शब्द दिले आहेत.त्यातील ३रा शब्द आजचा विषय आहे त्यावर मी माझे विचार देण्याचं प्रयत्न करतोय.
शब्द हेच भगवान शब्द हेच शैतांन या प्रमाणे शब्द बोलताना सांभाळून बोलावं कारण आपल्या मार्गातील शिकवण तशी आहे, बाबांनी प्रत्येक दुःखी कष्टी मानवाला आपल्या जवळ घेतलं आणि दुःखी मानवाला सुखी जीवन देऊन जगण्यास मदत केली ते फक्त प्रेमाने.
आपल्याला या मार्गात प्रेमाचे आचरण आपल्या कुटुंबात करायचे आहे लहान मुलांना समजवून सांगितल तर ते सांगितलेल काम निश्चित ऐकतात हे आपण अनुभवले आहे.
त्याचबरोबर प्रेमाने अक्ख जग जिंकता येते,मानवाने मानवा सारखे वागावे सर्वाशी व्यवहार करताना सांभाळून बोलावं मर्यादा असली पाहिजे बोलताना त्यातून मग प्रेम निर्माण होते.
आपण आपले कार्य परमेश्वराला समोर ठेवून करावे त्यातून कोणतेही काम सहज होते.
त्याचप्रमाणे सेवकांशी बोलताना व्यवहार करताना सत्य मर्यादा आणि प्रेमाचे आचरण करून व्यवहार करावे. माझ्या लिहण्यात काही चुकलं असेल तर क्षमत्व सर्वांना माझा नमस्कार.
सेवक : हितेश मेश्राम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ६ 】
♦ "प्रेमाने वागणे''
♦ प्रेमाने वागणे हे शब्द बाबांनी सेवकांना दिला आहे ज्या ठिकाणी प्रेम असते तिथे मर्यादा
♦ ही टिकून राहते म्हणून बाबानी आपल्याला जीवनात कसे जगावे यासाठी बाबांनी आपल्या सर्वांना तीन शब्द दिला आहे
१)सत्य बोलणे
२)मर्यादा पाळणे
३)प्रेमाने वागणे
♦ या तीन शब्दात मध्ये जीवन कसा प्रकारे जगावे या करिता दिला आहे.
♦ आजचे विषय
♦ प्रेमाने वागणे
♦ जर आपण एखाद्या लहान किंवा मोठया व्यक्तीला रागाने काम सांगितले तर तो सांगितलेले काम करणार नाही व तेच काम जर आपण त्या लहान किंवा मोठ्या व्यक्तीला प्रेमानं काम सांगितले तर तो काम हा यशस्वी रित्या पार पडेल व त्यांचे आत्मबल वाढेल व कार्य हे व्यवस्थित रित्या पार पडले.
♦ माझ्या लिहण्यात काही चुकी झाल्या असतील तर मी सर्व प्रथम भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो महान त्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो सर्व सेवक दादा व सर्व सेवक ताईंना माफी मागतो.
नमस्कारजी.
सेवक : राजेंद्र ढबाले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ७ 】
♦ विषय:- ✍ बाबांनी आपल्याला भगवंत गुणांचे ३ शब्द दिले आहेत आपल्या कुंटुंबात व सेवकात त्यापैकी 3 रा शब्द "प्रेमाने वागणे" या शब्दाचा अर्थ मी आपल्या अल्पबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
⏩महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले देह चंदनासारखे झिजवून एका भगवंताची प्राप्ती केली आणि दुःखी कष्टी लोकांना दुःखातून मुक्त करून सुखी समृद्ध बनविले.
⏩आपल्या अंतःकरणातील निर्माण झालेला जिव्हाळा किंवा दुसऱ्या व्यक्तीविषयी अंतःमनात निर्माण झालेली आपुलकी हे खरं प्रेम आहे. प्रेमात इतकी ताकत आहे की, सर्व जग सुद्धा जवळ करू शकतो, (काही अपवाद वगळता) लहान मुलाला जर आपण प्रेमाने वागविले किंवा बोलले तर त्याचा आत्मविश्वास नेहमी वाढत असतो.
⏩उदाहरण द्यायचं झालं तर एक म्हण आहे की, आपण जर दगडावर सुद्धा प्रेम केलं तर दगडाला सुद्धा पाझर सुटतं. सांगण्याचा तात्पर्य अस की, आपण या मार्गात असतांनाच नाही तर व्यवहारात किंवा मानवी जीवन जगत असतांनी आपल्या कुंटुंबात सेवकात व इतर सगळ्यांशी प्रेमाचे आचरण असणे गरजेचे आहे.
⏩चेहऱ्यावर दाखविलेले हास्य कधीही खरे राहू शकत नाही. खरं प्रेम हे जर निर्माण होत असेल तर ते आपल्या मनातून, अंतःकरनातून उमटवला पाहिजे. प्रेम हा भगवंताला आवडणारा सर्वात प्रिय गुण आहे.
⏩दुःखाच्या किंवा संकटाच्या वेळी आपल्या परिवारामध्ये राहून आपल्या परिवारातील व्यक्तीना केलेले सहकार्य किंवा त्यांच्या पाठीशी राहणे यातून खरं प्रेम दिसून येते.
♦ माझ्या बोलण्यात सांगण्यात किंवा लिहिण्यात काही चुका किंवा त्रुटी झाल्या असतील तर त्याबद्दल सर्वप्रथम *स्वयंम भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणशी आई* तसेच सर्व *सेवक दादा व ताई* मला माफ करतील अशी सर्वाना विनंती करतो.
सेवक : प्रशांत मानापुरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
【 विचार क्रमांक ८ 】
♦ प्रेम वागणे;
♦ प्रेम हा भंगवताला आवडणारा प्रथम गुण आहे.प्रत्येक मानवाचा मनात प्रत्येकाविषयी प्रेम असायला पाहिजे.जसे प्राणी हे सुद्धा एक जुटीने राहून एकमेकाशी प्रेमाने वागतात.तसं सेवकानी व सेविकीनी सुद्धा एकता निर्माण करून एकजुटीने राहून कुटुंबात व्यवाहारात प्रपंचात राहून प्रेमानं बोलायला पाहिजे.बाबा नेहमी मार्गदर्शन करतात की,त्यांनी आपल्या कुटुंबात व सेवकात प्रेम हा गुण असायला पाहिजे.सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे.या म्हणीप्रमाणे आपण आपआपसात प्रेम निर्माण केला तर आपुलकीची भावना निर्माण होते.त्यामुळे सर्वाना आयुष्यात सुख समाधान मिळते.मानव धर्माच्या शिकवणीचे पालन करून मी प्रत्यक्ष आचरणामध्यये आणणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे..."आता ही बाबा आत्मबोलाने आले,तरी तुमच्याकडून धन,दौलत ,पैसा मागत नाही तर, तुमच्या या सेवक-सेविकाकडून सत्य, मर्यादा,प्रेमाची भीक मागतात हो सेवक''...यामध्येच प्रेम निर्माण होतो.कोणालाही रागावू नये. कुणी चुकले तर त्याला समजावून सांगणे लहान मुलाना प्रेमाने संगितले तर त्याला लवकर कळते.पण रागावले तर त्यांचं आत्मबल कमी होते.जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादां भंग होते.आपल्या आई-वडीलांचा, सेवक-सेविकाचा, भाऊ-बहिणीचा, लहान-मोठयाचा मन:पूर्वक आदर करून आणि सत्य,मर्यादा,प्रेमाचे पालन करून त्यातच प्रेमाची व आपुलकीची भावना निर्माण होते..
सेविका : अश्विनी मारवाडे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सौजन्य :
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा