"षष्टीच्या हवनकार्याचे महत्व" काय आहे? What is "The Importance of Humanity"? - बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी

Breaking

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

"षष्टीच्या हवनकार्याचे महत्व" काय आहे? What is "The Importance of Humanity"?


          "षष्टीच्या हवनकार्याचे महत्व" काय आहे?

! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!!! परमात्मा एक !!!

    बाबांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट, नियम त्यांना आलेल्या अनुभवातून आणि भगवंतानी त्यांना वेळोवेळी दिलेल्या प्रचिती व मार्गदर्शनातुन दिलेले आहेत.

      महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करुन ही परमेश्वरी कृपा निष्काम व निस्वार्थ भावनेने दुःखी लोकांना फुकटात वाटुन, लाखो लोकांचे दुःख दुर केले.

       महानत्यागी बाबा जूमदेवजींच्या घरी खूप दुःख होते आणि अशी बिकट अवस्था होती की, प्रत्येक वेळेस घरच्या कर्त्या व्यक्तीचा देहांत व्हायचा. असे होत होत त्यांचे वडील, काका यांचा देहांत झालेला आणि नंतर फक्त ४ भाऊ उरलेले होते. अश्या बिकट परिस्तिथीत बाबा एका मांत्रिकाकडे जाणार असताना कधी घरी न येणारा एक साधा व्यक्ती घरी आला आणि म्हणाला की, मला एक परमेश्वरी शक्तीला प्राप्त करण्याचा विधी माहिती आहे आणि त्या विधीने दुसऱ्यांचे पण दुःख दूर होतात. तो व्यक्ती मौदा या गावचा होता आणि त्या व्यक्तीने ती विधी कधीही करण्याचे धाडस दाखविले नव्हते. त्या साध्या व्यक्तीस बाबांनी विचारले की, तुम्ही तर संन्यासी दिसत नाही आहात, मग तुमच्याकडे हि विधी कशी? 

          तर तो व्यक्ती म्हणाला की, माझे वडील एका संन्यास्या सोबत राहायचे, तर हा विधी त्यांचा आहे आणि तो संन्यासी मरण पावल्यामुळे माझ्या वडिलांनी त्या संन्यासाचे सर्व ग्रंथ घरी आणले आणि माझे वडील काही लोकांना तीर्थ करून देत असे परंतु, त्यांनी यामध्ये स्वतःचे डोळे गमावले आणि आंधळे झालेत. म्हणून मी पण हा विधी कधीही करण्याचे धाडस केले नाही.

           त्या साध्या व्यक्तीने बाबांना एक कल्पना दिली कि, ज्या व्यक्तीने हा विधी केलेला आहे तो असफल झाल्यामुळे एक तर मरण पावला किंवा वेडा झाला आहे.
         हे ऐकून बाबांनी हि समस्या सर्व भावंडापुढे ठेवली. परंतु जीवाची भीती असल्यामुळे कुणीही तयार झाले नाही. म्हणून बाबा जुमदेवजींनी निर्णय घेतला की, मी हा विधी करणार आणि मला काही झाले तर तुम्ही माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा.

          विधिच्या २१ व्या दिवशी बाबांचे थोरले बंधू नारायणराव बाबांकडे आले व सांगू लागले की, माझ्या मुलीची प्रकृति खुप खराब आहे. माझ्यासोबत घरी चल आणि तिला त्रासातुन मुक्त कर. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की, मला यातले काहीच कळत नाही. मी फक्त पहाटेस उठून हनुमानजीला कपूर लावून मंत्र म्हणतो व प्रदक्षिणा घालतो. तेव्हा त्यांच्या बंधुनी बाबाला घरी येण्याची आणि मुलीला बघण्याची विनवनी केली. तेव्हा बाबांनी त्यांच्या शब्दाला मान दिला व त्यांच्या घरी गेले.

            बाबांना त्या मुलीला पाहून खुप दुःख झाले. तिच्या संपूर्ण अंगावर खुप मोठेमोठे फोड़े आले होते. ते फुटून पूर्ण शरीरावर रक्त वाहत होते. त्या मुलीचा अंग पूर्ण लाल मुंग्यानी व्यापला होता. हे पाहून बाबा खुप घाबरले व विचारमग्न झाले. त्यांच्या मनात आले की, बाबा हनुमानजी ला प्रसन्न करण्याकरीता विधि करने खुप कठिन आहे अशी जी समजूत आहे, ती खरी असावी, आता मात्र परमेश्वर आपल्याला ही विधि पुर्ण करू देणार नाही.

           परंतु विधि तर पुर्ण करायची आहे, नाहीतर काय दुःख येईल हे सांगता येत नाही. "एकीकडे खाई" व "दूसरी कडे विहीर" अशी अवस्था बाबांची झाली होती, पण बाबांचा निर्धार पक्का होता. ते डगमगले नाही. तेथे बाबा काहिही न बोलता कोणतेही उपचार न करता घरी परत आले.

             दुसऱ्या दिवशी म्हणजे विधिच्या बाविसाव्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे देवळात गेले, तिथे त्यांनी बाबा हनुमानजींची  आंघोळ घालून कापुर, अगरबत्ती लावली व विनंती केली की, हे भगवान बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर खुप मोठी आपत्ति आणून ठेवली आहे, मी आपणास विनंती करतो की, मला आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा. 


             त्यानंतर बाबा एकविस प्रदक्षिणा घालून घरी आले. त्या दिवशी बाबांच्या मनात दुसरा कुठलाच विचार आला नाही. तो दिवस तसाच गेला.

             तेविसाव्या दिवशी बाबा पहाटेस विधि आटोपुन घरी येवून सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळ बसले होते, ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घराच्या अंगनात खेळत होती. बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले. तिला पाहुन बाबांना आश्चर्य वाटले. त्या मुलीचे सर्व फोड बसले होते. हे पाहुन बाबांना समाधान वाटले.


                या प्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वरा विषयी असलेले अतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहुन त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद दिला. बाबांना पहिली सफलता प्राप्त होवून परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार झाले. अशा प्रकारे बाबांनी ४१ दिवसांचा विधी पुर्ण केला व ४२व्या दिवशी साखरेचा नैवेद्य केला. तो दिवस ६ जानेवारी १९४६ रोज रविवार असुन बाजाराचा दिवस होता. या वेळेस बाबा जेमतेम २५ वर्षाचे होते. 


परमेश्वराबद्दल बाबांमध्ये खुप आत्मीयता आणि जिद्द आहे, हे गुण यावरुन लक्षात येते.

              विधी समाप्त केल्यानंतर बाबा मौद्याला गेले व ज्या व्यक्तीकडे बाबांना दिलेला मंत्र लिहून होता, त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले. थोडा वेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की, काल विधी समाप्ती झाली. सर्व विधी सुरळीत पार पडली. असे सांगून पुढील कार्य सांगण्यास विनंती केली.


              पुढच्या कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की, रोज एकवेळा या प्रमाणे ७, ११, २१, ३१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि १०१ दिवस त्याच मंत्राने १०८ वेळा मंत्र म्हणुन तितक्याच वेळा हवनात तुप आणि आहुती टाकावी लागते. परंतु जो संन्यासी मरण पावला, ज्याचा हा मंत्र होता, तो त्रीताल (एका रात्रीतून तिन वेळा ) हवन करत होता. 

              त्याचा विधी असा की, संध्याकाळी सुर्यास्तानंतर सुरु करुन रात्रभरात तिन्ही हवन सुर्योदयापर्यंत संपले पाहिजे. जागा साफ करणे, आंघोळ करणे, हवनाची रचना करून १०८ वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडणे. पहिले हवन संपले की दुसरे सुरू करण्यापूर्वी तिच जागा स्वच्छ करून व आंघोळ करून त्याच जागेवर परत हवनाची रचना करावी. पुन्हा प्रसाद करावा आणि हवनाचा विधी पूर्ण करावा. तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे. अशा प्रकारे तीन हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे. हे त्रिताल हवन ७, ११, २१ ते १०१ दिवस करावे लागते. हवनाकरीता लागणारे साहित्य म्हणजे रानगोवऱ्या, पिंपळ, वड, संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी पाच झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफूल, आहुतीत सोडायला तूप (ऐपतीप्रमाणे साजूक किंवा वनस्पती), दही, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो, गोमूत्र, चंदनचुरा, हवनपुडा, अबीर, सेंदुर, गुलाल, पान, सुपारी इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई (हलवा) करावी लागते.


               हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले. तेव्हा घरातील सर्वजण त्यांची वाट पाहतच होते. घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रिताल हवन करू. याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल. म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण सर्वांचे जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही. त्यामुळे मजूरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवनकार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले.

           ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजूरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि संध्याकाळी सात वाजता पहिल्या हवनाला सुरुवात केली. या मार्गातील सेवक ज्याप्रमाणे हवनाची मांडणी करतात त्याच प्रमाणे त्याची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवनकार्याला सुरुवात केली. पहिले हवन संपले की दुसरे, तिसरे हवन करीत पुर्ण सात दिवस त्रिताल हवन केले. पहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत. नंतर दुसरे हवन रात्री अकरा वाजता सुरू करीत. तिसरे हवन रात्री तीन वाजता सुरू करून पहाटे पाच वाजता संपत असे. परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत. यावेळेस खूप त्रास होत होता. बाबा स्वतः हवन करीत होते. त्याशिवाय स्वतःच हवनात आहुती सोडायचे. दुसऱ्या कोणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती. हवन करताना बाबा कोणाशीही बोलत नसत. एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे. जर काही विचारायचे असेल तर, पाटीवर पेन्सिलीने लिहून किंवा कागदावर पेनाने लिहून विचारत असत. याप्रमाणे बाबांनी सतत सात दिवस त्रिताल हवन केले. 

               बाबांचे देहभान हरपले व बाबा निराकार स्तिथीत घरच्या कुटुंबियांना म्हणाले की, सेवक भगवान बन गया है। क्योकी भगवान का सीर और सेवक का धड, और सेवक का सीर और भगवान का धड एक हो चुका है, सेवक भगवान में मिलिन हो चुका है । कृपया किसीभी बाई कि परछाई सेवक (बाबा) पे ना पडणे दे नही तो सेवक भस्म हो जायेगा। कहीका नहीं रहेगा।

              अशारितीने बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे घरच्यांनी भगवंतास विनंती केली, तर भगवंत बाबांच्या मुखातून म्हणाले की, एवढी काळजी होती तर कशाला माझी प्राप्ती केली. तर सर्व कुटुंबीयांनी विनंती करून कार्य केल्यामुळे बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले.


                   त्या साध्या व्यक्तीच्या वडिलांजवळ तो विधी होता, जे आंधळे झालेले आणि त्यांच्या वडिलांचा मित्र जो संन्यासी होता, त्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीला माहिती असून पण त्यात ती विधी करण्याचे धाडस नव्हते. म्हणून त्याने बाबा जुमदेवजीला फक्त हि विधी दिली. परंतु, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये हे धाडस नव्हते, की ही विधी करावी आणि ते धाडस फक्त आणि फक्त बाबा जुमदेवजींनी दाखवले आणि ती विधी पूर्ण करून भगवंताला म्हणजेच निराकार शक्तीस प्राप्त केले आणि भगवंताने त्याच्या गुणांची ओळख बाबांना करून दिली आणि पूर्ण आकाशात एकच डोळा दाखवला.

बाबांनी बाबा हनुमानजीची प्राप्ती व एका भगवंताची प्राप्ती कशी केली.


             लहान पणापासून बाबा जुमदेवजी हनुमानजीची पूजा करत होते आणि ही विधी करताना त्यांनी हनुमानजीला समोर ठेवून केली. परंतु ज्या वेळेस शांताबाईच्या अंगातील भूत निघत नव्हते, तेव्हा बाबांनी प्रश्न केला की, "ऐसी कोणसी शक्ती है, जो शैतानको एक पलमें निकाल सके, शैतान किसे कहे और भगवान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमे समझा दो" त्या वेळेस बाबांना त्या निराकार चैतन्य शक्तीने म्हटले की,

                 "यह एकही परमेश्वर है, जीसने इस सृष्टीका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ति है, जो निराकार है। वह चोबीस घंटे चैतन्य है, उसे प्राप्त करनेके लिए पांच दिन हवन करना पड़ेंगा।" त्यांनतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की, "परिवार के लोग सुनो, हम कलसे पांच दिन हवन करेंगे।"

                  ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी पाच हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वद्य प्रतिपदा व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख २० ऑगस्ट १९४८ होती. पाचव्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रह्मांड चढले. ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खूप आकांत करून रडू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, "मैं कहा आ गया हूँ!" असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून रडू लागले. घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, "घरवालो सुनो, मैं कहा आ गया हूँ। सेवक भगवान बन गया।" 


                     हे ऐकून बाबांच्या कुटुंबातील सर्व घाबरले व त्यांना "बाबा चूप हो जाओ" असे विणवु लागले. परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते. "मैं कहा आ गया हुं" असे म्हणत बाबा सारखे एक ते दीड तासपर्यंत आकांत करून रडत होते. त्यांनतर शांत झाले व निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. त्यांनतर त्यांनी जेवण केले आणि आराम केला परंतु ते जणू गुंगीतच होते.

                      दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य शष्टी होती. त्या दिवशी १९४८ सालच्या ऑगस्ट महिन्याची २५ तारीख असून बुधवार होता, या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवणाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले. हवन झाल्यावर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले व ते देहभान विसरले आणि त्यांचे ब्रह्मांड चढले. ते निराकार स्थितीत आले व काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, देशात जितकी दैवते आहेत ती सर्व बाबांना एकामागून एक दर्शन देऊन जात आहेत व आपला परिचय देत आहेत. ही क्रिया खूप वेळ चालली.


                  ही संपूर्ण क्रिया झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आलेत त्यांनी आपला परिचय दिला. या वेळेस बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की, 

"मैं सबका एकही भगवान हूँ। सेवक, तु मुझे कहा ढूंढ रहा है। मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जाएगा।"

तेव्हा बाबांना वाटले की, "मैं कितना पागल हुं" भगवान मेरे पास होकर मैं ऊसे कितना दूर तलाश रहा हुं।"


                  तेव्हा बाबांना प्रचिती मिळाली कि, या जगाचा एकच भगवंत आहे, जो निराकार आहे, चैतन्य आहे आणि तो कुठल्याही मूर्तीत विराजमान नाही.

                 परंतु बाबा अजूनही मंदिरात जायचे व बाबा निराकार अवस्थेत असल्याने बाबांच्या मुखकमलातून त्या निराकार शक्तीने म्हटले की, "हे मानव भलेही तुने मुझे प्राप्त किया हो, लेकिन मैं मानव पे कदापि विश्वास नाही करता। क्योंकी, मानव यह बेईमान हैं।"

यावर बाबांनी त्या निराकार शक्तीला दोन वचन दिले

१)परमात्मा एक

२)मरे या जीये भगवत नामपर

तेव्हा त्या निराकार शक्तीने दोन वचन बाबांना दिले

३)दुःखदारी दूर करते हुये उद्धार 

४)इच्छा अनुसार भोजन


                     थोडा वेळ शांत राहून बाबा कुटुंबातील व्यक्तींना उद्देशून म्हणाले की, "परिवार के लोग सुनो, इस परिवार के लोग सारी पूजा बंद करके एकही भगवान को मानेंगे।"

त्यांनतर बाबांची निराकार अवस्था संपली व ते देहभानात आले.

                 म्हणून मूर्तिपूजा बंद करण्यात आली व देवळात जाणे बंद करण्यात आले आणि एकाच भगवंताची पूजा करायला सुरुवात झाली. म्हणून आपण षष्टीचे हवन बाबांच्या आदेशाप्रमाणे राखीनंतर ६ व्या दिवशी प्रत्येक वर्षी प्रगट दिन म्हणून साजरा करीत असतो.

              ज्याप्रमाणे अनेकातील लोक दिवाळी हा सर्वात मोठा सण माणुन खुप उत्साहाने साजरा करतात, त्याचप्रमाणे आपल्यासाठी षष्ठी चे हवनकार्य हा सर्वात मोठा सण आहे व दिवाळी या सणाचे आपल्यासाठी काहीच महत्त्व नाही. 

               या दिवशी प्रत्येक त्याग झालेल्या कुटुंबात षष्ठी चे हवनकार्य कुटुंब प्रमुखांनी घडवायलाच पाहिजे. यात कसलिही सुट नाही आणि म्हणून सेवक नोकरी किंवा शिक्षणानिमित्त जरी बाहेर राहत असतील, तरी षष्ठी च्या हवनाला घरी येऊन एकतेने हा सण साजरा करत असतात.

                 काही त्याग झालेल्या कुटुंबात षष्ठी च्या हवनकार्याच्या अगोदर साधे कार्य करून हवनाच्या दिवशी त्या कार्याची समाप्ती करत असतात. परंतु, माझ्या मते तरी हे चुकीचे आहे. कारण, असे केल्यास ते हवनकार्य साध्या कार्यानिमित्त घडविले असा त्याचा अर्थ होतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाबांनी आपल्याला भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त प्रत्येक वर्षी त्यागी कुटुंबात हवन घडविण्यास आदेश दिलेला आहे, परंतु षष्ठीस अनुसरून आधी साधे कार्य कधीच करण्यास आदेश दिलेला नाही. त्यामुळे बाबांनी आपल्याला जे सांगितले आहे, तेच करणे हे आपले कर्तव्य आहे. जर, साधे कार्य करून हवन घडवायचे असते तर, बाबांनी याबद्दल नक्कीच सांगितले असते. म्हणून नवीन नियम तयार न करता, बाबांनी सांगितल्याप्रमाणेच आपण कार्य करायला हवे. 

                तसेच, काही सेवक या दिवशी अनेकांना जेवणाचे आमंत्रण देतात. तर, यात एक दक्षता घ्यायला हवी की, व्यसनी नातेवाईकांना जेवण सांगताना अगोदरच त्यांना सांगावे की, व्यसन करून येऊ नये व शब्दांची सोडवून करावी. हवनापेक्षा व मार्गाच्या शिकवणूक पेक्षा व्यसनी लोकांना महत्त्व देउ नये व दुःखाचे भागीदार होउ नये. आपल्यासाठी हवनकार्य महत्त्वाचे आहे, जेवण सांगणे महत्त्वाचे नाही आणि हवनकार्यात व हवनकार्याच्या विधी मध्ये अनेकवाल्यांना कोणताही हस्तक्षेप व कोणतेही सहभाग घेऊ देऊ नये. ते फक्त उपस्थित राहून, हवनकार्याचा लाभ घेऊ शकतात.


                अशाप्रकारे "एका भगवंताचा प्रकट दिन" म्हणून आपण त्याग झालेले सेवक एकाच दिवशी सर्व कुटंबात एका भगवंताचे हवनकार्य एकतेने करून साजरा करत असतो व साधे सेवक सुद्धा या हवनकार्यांचा लाभ घेऊन हा दिवस साजरा करत असतात.

              आपण हिंदू धर्मात असल्यामुळे, एका भगवंताचे प्रतीक म्हणून बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानाजीला गुरु मानले होते, म्हणून बाबा जुमदेवजींचे गुरु बाबा हनुमानजी आहे व आपण बाबा जुमदेवजीला आपले गुरू मानतो.


सतत परमेश्वरी कृपेचा प्रसार व प्रचार बाबांनी खालीलप्रमाणे केला.


               महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या घराचे सर्व दुःख वरील प्रमाणे एका भगवंतास प्राप्त करून दूर केले आणि सुख समाधानी मिळविली. परंतु बाबांना विचार आला की, एवढी मोठी विलक्षण आणि जागृत शक्ती जर आहे, तर का नाही आपण अनेकांना याचा फायदा करून द्यावा आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अनेक परिवारांना त्यांच्या दुःखातून दूर करण्याकरिता आपली पुढली वाटचाल चालू केली. परमेश्वरास दिलेल्या वचनास घेऊन निष्काम तसेच निस्वार्थपणे अनेकांना या मार्गाला जोडण्याकरिता सुरुवात केली आणि अनेकांचे दुःख दूर करण्यास मदत केली. अनेकांना मार्गदर्शन केले, सेवक संमेलन घेतले, चर्चा बैठक घेण्यास आदेश दिला आणि ४ तत्व, ३ शब्द व ५ नियमांना अंगिकारून जगायला शिकविले. बाबांनी "परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर" ची स्थापना करून एका नव्या युगाची सुरुवात करून "मानव धर्म" तयार केला आणि जसे जसे अनेक सेवक जुळत गेले, तसे तसे अनेक शाखा स्थापन केल्या, ज्या नागपूर मंडळांतर्गत कार्यरत ठेवल्या.

           अनेक बँक, दूध डेअरी, ग्राहक भंडार संस्था, धर्मार्थ दवाखाना अश्या अनेक संस्था सेवकांकरिता उभारल्या आणि आयुष्यभर फक्त अनेकांना भगवत गुणांचे निष्काम आणि निस्वार्थपणे खेडोपाडी जाऊन कार्य करून जगवण्याचेच कार्य केले.


-------------------------------

What is "The Importance of Humanity"?

! God bless Lord Hanuman!
!! Greetings to Mahantyagi Baba Jumdevji !!

!!! God is one !!!

      Baba has given us everything from the rules and guidelines given by him and guidance given by him to him from time to time.

      By receiving great God by great sage Baba Jumdevji, God's grace, without any selfless and selfless self-gratitude, made the people of the poor feel sad, removing the grief of millions of people.

       There was a lot of sadness in the house of great lord Baba zumdevji and there was such a bad situation that every time a person's body died, the person died. His father, uncle, was dead and later only 4 brothers remained. When a person came to a maternal aunt, a simple person who never came home came home and said that I know the rituals of getting one god of power and that law will remove the pain of others. The person was from Mouda village, and that person did not dare to do that ritual. He asked the ordinary person that you are not seen as a monk, then how can you do this ritual?

          The person said that my father would stay with a sannyasin, then this ritual is theirs and because of the death of the monk, my father brought all the sannyasa books home and my father used to make some pilgrims, but he lost his eyes and blinded . So I did not even dare to do this ritual.

           The simple person gave Baba an idea that the person who has done this ritual has either died or is crazy due to failure.

         Baba has kept this problem before the audience. But no one was prepared because of fear of life. So Baba Jumdevji decided that if I do this ritual and if anything happens then you should take care of my family.

          On the 21st day of law, the eldest brother Narayan Rao came to Baba and began to say that the nature of my daughter is very bad. Get home with me and get rid of it. So Baba said to them that I do not understand anything. I just wake up in the morning and say Hanumanji with a camphor and chant it. When his brother Baba asked Baba to come home and see the girl. Baba respected his word and went home.

            Baba was sad to see that girl. Her whole body was boiled. They were bleeding and bleeding. The girl's body was filled with full red ants. Baba was very scared and stunned. They thought that Baba is very difficult to make Hanumanji the law to please, that it should be true, now God will not let you fulfill this law.

           But the law is to be fulfilled, otherwise it can not be told what a sadness it will be. Baba had a condition similar to that of "Khai" and "Betel to another", but Baba's determination was certain. They did not stagger. There, Baba returned home without any treatment.

             On the next day, on the twenty-seventh day of law, in the day of the fixed time, he went to the temple where he was bathed with Baba Hanumanji and started kapoor, agarbatti and requested that, Lord Lord Hanumanji, you have brought me great objection, I request you to, Do this, otherwise release the girl.

             After that Baba went to the house with the help of awaited Prakadakina. There was no other thought in his mind that day. That day went in the same way.

             On the twenty-third day Baba Dwivedi was sitting at the door in the upper room after coming out of the law, when the girl who was in trouble was playing in her house. Baba's attention went to that girl. Baba was surprised to see her. All of that girl was sitting on the floor. Baba found satisfaction with this.

                Thus, Jehovah took the first test of Baba, and the Lord responded to the request by Baba's love and conviction with regard to the Lord. Baba's first attempt to achieve God's grace came true. In this way, Baba completed 41 days of rituals and on the 42nd day the sugar was offered. It was on Sunday 6 January 1946 that Sunday was the market day and on Sunday. This time Baba Jemtem was 25 years old.

It has been noticed by the qualities of God that there is a lot of intensity and stubbornness in the Lord.

              After the end of the ritual, Baba went to Mudia and whoever wrote the mantra given to Baba, he entertained Baba as a guest. After sitting for a while, Baba said that yesterday the end of the ritual was concluded. All the rituals went smoothly. Saying this, I requested to do the following.


              Talking about the next work, the person said to Baba that once the same mantra, 738, 71, 81, 91, 81, 61, 71, 81, 91 and 101 days of the same time 108 times Mantra has to be done and the sacrifice must be done. But the monk who died, who had this mantra, he was doing havitan (three times in a night).

His ritual is that after starting the sunset in the evening, all the three havnas should end in sunrise. Wake up space, take bath, and sacrifice 108 times by sacrificing Mantra. Before the first anniversary is over, clean the first place and start bathing again at the same place after bathing. Repeat the meal and complete the Havan. After the completion of the third day, clean the place in that place and after bathing it should be done again. Thus, the three-haven should be completed in one night. This Trident must be 7, 11, 21 to 101 days. For the purpose of avant gardens, five trees, coconut, fruits, leaves, betel nut, necklace, bellflower, ghee, curd, milk, only the trees, piglets, wads, oranges, cucumber, mango, Photo of Baba Hanumanji, Gomutra, Chandan Chura, Hawanpura, Abir, Sandur, Gulal, Pan, Supari etc. are required and Kadai (Halva) has to be done as Prasad.

               Baba went back to Nagpur on a regular note. Everyone in the house was waiting for them. When he came home, he told all the above information to the people and said that this is a matter of expenditure. Already your financial situation is very bad. So, after weaving the weavers all day long, after getting the wages in the evening, buy the baggage and do the trinity. Apart from this, there will be awakening overnight due to Trinity Havan. So everyone does not need to be hungry. Because if we wake up, we will not be weighed the next day. It will not get sanctioned and due to non-availability of luggage, it can not be done and will be divided in the air. Everyone thought seriously about it and decided to do the trilateral havan for seven days from day one.

           On the next day, we made all the weaving and evening wages and agreed to adjust the baggage and started the first hawk at seven o'clock in the evening. The way in which the servant in this path was arranged, he made the arrangement and started his devotion as mentioned. After the first anniversary was completed, the third consecutive day has been consecrated for seven days. Having eaten after the first ever meal Then the second halt started at eleven at night. The third havan started at three o'clock at night and ended at five o'clock. Were weaving the bags on the next day after the weaving all day. This time there was a lot of trouble. Baba was offering himself. Apart from this, the sacrifice itself has to be sacrificed. No other person was allowed to sacrifice in Eve. Baba would not talk to anyone while giving a havan. If a thing happens then the gesture will tell. If you want to ask something, ask Pencil on pen or write a pen on paper. Similarly, Baba has made a trilateral havan for seven consecutive days.

               Baba's consciousness was lost and Baba said in a formless form to his family, that the servant has become a God. Because the Lord's head and the servant's work, and the servant's head and the message of God have already become one, the servant has merged in God. Please do not allow any woman to fall on the shadowed servant (Baba), otherwise the servant will be consumed. There will be no words.

              As a result of Baba's formless condition, the family requested God, but Bhagwant said from the mouth of Baba that if he had such concern, why did he get me. When all the family members were working on request, Baba came out of the formless form.


                   The person had a ritual for the father of that simple person, who knew the person who was blind and his friend's friend was a monk, but the person did not have the courage to do that. So he gave Baba Jumdevji the ritual only. But, no other person had the courage to do this ritual, and that courage was shown only by Baba Jumdevji and he fulfilled the rituals and attained God's formless power and God showed his qualities to Baba and showed only one eye in the entire sky.


How did Baba receive Baba Hanumanji and receive one God?

             Baba Jumdevji was worshiping Hanumanji from a small stage and in keeping with this ritual, he kept Hanumanje in front of him. But when the ghost did not leave the peace, Baba asked, "There is such a power which can throw the devil out in one moment, tell the devil what to say, and explain to God what he says," At that time Baba said to him the formless Chaitanya Shakti That,

                 "This is God, who has created this creation, he is an awakened power, which is formless. He is twenty-four hours conscious, he will have to sacrifice five days to get it." Shortly after that Baba addressed the people of the house in that formless state, "Listen to the people of the family, we will hav for five days."

                  According to the decision, from the very day the Baba started a similar evening every five Hovn everyday. This day was the Shravan Vada Pratipada and it was Friday Friday. That date was August 20, 1948. At the end of the fifth day, the universe of Baba got up. They forgot the consciousness and came into a formless state. In that state, they started crying so loudly. All the people in the house were present. In that formless state, the word came out of the mouth of Baba, "I have come!" So again, loudly cried loudly. Addressing the people of the house, he said, "Listen to the family, I have come, the servant becomes God."

                     Baba's family became frightened and heard him say, "Baba is happy." But Baba was in a formless state and could not understand anything. Baba was crying for one to one and a half hours saying, "I have come here." After that, they became calm and in a formless state, they came to restrain themselves. After that they had to eat and rest, but they were in the dump.

                      The next day, the Shravan Vardh was a Shastra. On that day, on the 25th of August, the year of 1948, on Wednesday, it was on Wednesday that the people of the house were burnt due to Baba. After sacrificing, he started to turn off the limbs and forgot consciousness and their universe. They came into a formless state and after some time the word came out of their mouth, that all the gods in the country are going to give a glimpse of all the babus together and introduce themselves to us. This action is going on very long.

                  After this whole action, he finally came to know about the presence of a God in his body. At this time, Baba's mouth said,

"I am a god of all, servant, you are looking for me, I am around you twenty-four hours. The moment I miss you, your body will be dead."

Then Baba thought, "How crazy I am," Lord, how far am I searching for a reason.

                  When Baba came to know that there is only one God in this world, which is formless, it is consciousness and he does not sit in any idol.

                 Since Baba still went to the temple and Baba was in a formless state, that formless power from Baba's mouth said, "O man, you have received me, but I do not believe in human beings, because human beings are dishonest."

At that time, Baba made two promises to that formless force

1) Divine One

2) Murray or Jaiya Bhagwat name

So that formless power gave the two words to Baba

3) Deliverance by eliminating misery

4) Desired food

                     While remaining silent for some time, Baba said to the family members, "Listen to the people of the family, people of this family will stop worshiping God and obey any god."

After that Baba's formless state ended and he came to Dehbana.

                 So idol worship was stopped and the worship was stopped in the temple and the worship of one God was started. Therefore, we are celebrating Holi according to Baba's instructions, and on the sixth day every year it is celebrated as the manifest day.

              Just as many people celebrate Diwali with great enthusiasm, as is the biggest festival for us, and the festival of Diwali has no significance for us.

               On this day every head of the family should be made responsible by the head of the family. There is no excuse for this, and if the sevaks are still living outside the job or education, they celebrate this festival at home of Senthhi and come together.

                 In some abandoned families, performing simple work before the rehearsal of the family, they end up on the day of their work. But, in my opinion, it is wrong. Because, if this is done, it means that it is done on a simple function, and most importantly, Baba has ordered to make a family gift every year for the day of God-given reverence, but according to the preceding, there is no direct order to do simple work. Therefore, it is our duty to do what Baba said to us. If you want to make a wish for simple work, Baba definitely would have said it. So, without creating new rules, we should work just as Baba said.

                Also, some servants invite many people for a meal on this day. So, one should take precautions in this matter that before telling the addicts to the relatives, they should tell them that they should not be addicted and they should be removed. Do not give importance to addicts and partners of grief rather than teachings and paths. Happiness is important for you, it is not important to say a meal, and you should not take any intervention or any involvement with it for many people in the Havan and Havanakar rituals. They can only avail themselves of the charitable status, by being present.

                In this way, the servants who have been sacrificed as "the manifest day of a God" are celebrating the worship of one God in all the villages on one day, and the simple servants also celebrate this day by taking advantage of these offerings.

              Since you are in Hindu religion, Baba Jumdevji had considered Baba Hanumanajji as the symbol of God as a Guru, so Baba Jumdevji's Guru Baba Hanumanji and I consider Baba Jumdevji as our Guru.

Baba has been promoting and propagating the grace of God.

               Mahantyagi Baba Jumdevji got rid of all the grief of his own house by receiving one God like this and achieved happiness. But Baba thought that if there is such a great craze and awakened power, then why should we give this benefit to many and Mahantyagi Baba Jumdevji started his next venture to remove many families from their miseries. With the promise given to God, selflessness and selflessness began to add many people to this path and helped many to overcome the grief. Guided by many, attends a meeting, ordered discussion meeting, and taught 4 elements, 3 words and 5 rules. Baba founded "A Manav Mandal, Vardhman Nagar, Nagpur" by establishing "Param Poojya Parmatma Ek Sevak Mandal, Vardhman Nagar, Nagpur" and created a "human religion" by introducing a new era and as many of the servants got together, they established many branches in the same way, which were kept under the jurisdiction of Nagpur.

           Many banks, milk dairies, consumer warehouses, charitable dispensaries, and many others have worked for the survival of God and selflessly working in villages and villages.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

WebSite Developer & Designer
©✍ Laxman Mahule
☎️ 8007477425
mahulelaxman@gmail.com

Pages