बाबांनी मंडळाला आदेश दिले आहेत तर सेवक जोडण्यासाठी की तोडण्यासाठी ?
आणि मंडळाचा आदेश आहे की, मंडळा वेतिरिक्त इतर संस्था च्या हवणात जाऊ नये
एक भाऊ टिमकी मंडळ कडून कार्ये आहेत,दुसऱ्या भावाचे मोहाडी मंडळ कडून आहेत,आणि तिसऱ्या भावाचे नागपूर मंडळ कडून कार्ये आहेत
तत्व, शब्द, नियम विनंती प्रार्थना एकच आहेत भगवंत एक आहे
तर मार्गासाठी भावाने भावाच्या घरी जाऊ नये काय?
की मंडळाचे नियम पाळावे की बाबांचे आदेशाचे मान ठेऊन, भावाच्या घरी हवणाला जावे
विषय सुचक :- परमात्मा एक सेवा समिती
नमस्कार जी
विषय कठिण आहे पण महत्वाचा आहे आणि हा नियम त्यांना लागु होतोय जे सेवक मन एक मंदिर प्यार है पुजा या शब्दांना समजुन घेत नाहि व कुण्यातरी एक संस्थेला विशिष्ठ दर्जा देण्याचे कार्य सुरु आहेत.
बांधवांनो बाबांनी कधिच विचार केले नव्हते कि, माझ्या शरिररुपी निघुन गेल्यावर माझे मानव धर्माचे सेवक स्वतःला जेष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ समजतिल यात कुटूंब हि आला व सर्व सेवक परिवार पन आलाय.
बांधवांनो बाबांनी जे मानव धर्म बनविला ते मानव धर्म आज दिसुन येत नाहि. तर आजचा मानव धर्म वेगळाच दिसत आहे.
बाबांनी बनवलेला मानव धर्म कसा होता... नाविन्य केले बाबा बहुजन समाजात, जसा कमळाचा फुल ऊगवतो चिखलात. नव्याने घडविले कार्य मंडळाचे.

अर्थात... जसा आपन या मानव धर्मात येण्यापुर्वि जगत होतो मि पोवार, तु तेली, तो कुनबी, फलाना चांभार ढेकाना मरार ईत्यादि भागात आपन वाटनी झालेलो हो पन महान त्यागी बाबानी असे कार्य केले जे अशक्य व अवघड होते या ईतर समाजाला बाबांनी एकत्र आणले जसा या संसारात समाजाच्या नावाचा जनु एक चिखलच होता त्या चिखलात मानव धर्मच माझा परिवार असा सर्व जातिंना एकत्रित आणुन आपन सर्व मानवच आहो व आपली एकच जात आहे ते मानवता हे कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केले व एक नविनच या एक मानव धर्म समाजाचा नविन मंडळ बनविला परम पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ व या संसारात याचा रोप पेरला.
बांधवानो जो रोप बाबांनी परमात्मा एकचा, सत्य, मर्यादा, प्रेमाचा, मानव धर्माचा, रोवला तो रोप आज ठिक ठिकानी जागला व त्या रोपट्याना स्वतःच एक स्वातत्र्य मुळ मिळाले.
बांधवानो जरी याची मुख्य स्थर मुळ नागपुरातुन टिमकितुन निघिले असतिल पन आज याचे मुर दुर दुर पर्यंत निघाले आहेत.
बांधवानो बाबांनी जो मानव धर्म बनविला त्याला आज वेगळीच दिशा मिळाली व जो वरिल विषय आहे हा या विषयावरुन समजन्यात येईल. आज आपल्या मानव धर्मात किती तरी मंडळ व शाखा व संस्था निर्माण झालेल्या आहेत तर हे ईतके मंडळ, शाखा व संस्था निर्माण कुणापासुन झाले व हे काय म्हणुन झाले तर सर्व प्रथम बाबानी जो मंडळ बनविला त्यातिल काहि पदाधिकारी दोषी आहेत, त्यानंतर जेष्ठ, श्रेष्ठ मार्गदर्शक आहेत व काहि बहुत बाबांच्या कुटूबाचे पन आहेत. यांना असा वाटला कि आपन
कुठतरी कमजोर पडत आहोत किंवा आपले वर्चस्व कुठतरी कमी होत आहे, यात अजुन ईत्यादि कारणे असु सकतात.
बांधवानो आपन कुठे होतो, कुठे आलो, आणि आता कुठे गेवो यानंतर कुठे जाणार याचा भान तरी आपल्याला आहे काय.
बांधवानो आपन जेव्हा या मानव धर्मात प्रवेश करतो तेव्हा कुणाला पाहुन या मार्गात प्रवेश करतो कुणाची कार्य पाहुन या मार्गात मरतोय. तर ते फक्त महानत्यागी बाबा जुमदेवजीचेच. कुन्या एका विशिष्ठ मंडळाला पाहुन तर मार्गात नाहि आलो न. मग तुम्हिच विचार करावा व एकदा विचार करुनच पहावा कि, हि जो एक भगवंताची कृपा आहे व हि महान कृपा कोणी प्राप्त केली आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजी यानी या स्वतःला विशिष्ठ समजनाऱ्या मंडळ, शाखा, संस्थानी कि या स्वतःला जेष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक समजनाऱ्यांनी आता तुम्हिच विचार करावा कि, ज्या महामानवाने हि कृपा प्राप्त केली त्यांची कृपा व त्यांची शिकवन काय म्हणते आणि त्यांनी स्थापन केलेला मानव धर्म काय म्हणतोय.
बांधवानो बाबांची कृपा म्हणतो .. कि सेवक बनुन सेवा कारा, कर्मनिष्ठ रहा व वचन बद्ध रहा आणि सत्य, मर्यादा, प्रेमाने मानवी जिवन जगा तुम्हा भगवंत दिसेल.
बाबांची शिकवन... चार तत्व, तिन शब्द, पाच नियम .. या पाच नियमात व तिन शब्दात काय लिहले आहे हे जर मानवाला कळले तर कोणताच मंडळ, शाखा व संस्था स्वतःला विशिष्ठ समजनार नाहि.
बाबांचा मानव धर्म काय म्हणतो... तर .... मानवाने मानुसकिने राहने व मानवाने मानसावर प्रेम करने मग तुम्हिच विचार करावा कि बाबा जुमदेवजीचे विचार काय म्हणतात व या मंडळ शाखा संस्थांचे विचार काय म्हणतात.
बांधवानो बाबा जुमदेवजी यांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्रित आणुन जनु काहि चिखलात कमळाचा फुल ऊगवतो त्या प्रमाने समाजातील जो भेद होता तो मिटवला व आम्हा सर्वांना मानुस्की दिली व मानवाला मानवा सारख जगन्याची कार्य प्रणाली दिली व काल आम्हि मानुस बनतोच होतो कि
आज असे निदर्शनास येतोय यांच्या नांदात मंडळ, शाखा, संस्था .. हे काय करत आहेत तर जे दुखी मानव बाबाची कृपा पाहुन या मार्गात आले समाधानी झाले व आता समाधानी होवुन मि मंडळ, तु शाखा, तो संस्था असा भेद करुन आज भाऊ भावाचा विरोध करतांनी दिसत आहे, मानव मानुस्की विसरत आहे, बाबांनी दिलेली शिकवन चुकत आहे, बाबाची कृपा या विशिष्ठ मंडळ शाखा व संस्थाच्या नांदात आपन मानव धर्माला खालच्या क्रमवारीत नेत आहोत.
बांधवानो हे मंडळ शाखा संस्था असे एकटे एकटे का म्हणुन वागत आहेत तर याच्याहि मागे बहुत मोठा कारन लपलेला आहे.
बांधवानो फोटो कुठली आहे हे महत्वाचा नसुन सेवकाच विचार या मार्गा विषयी किती महत्वाचे आहेत हा मुख्य कणा आहे.
बांधवानो जरी तो सेवक कोनत्याहि मंडळासी, शाखेसी, संस्थासी जुळला असेल पन त्या सेवकाच्या घरी मंडळाच शाखाचा व संस्थाचा हवनकार्य किंवा भगवत कार्य होत नाहि तर बाबांच्या शिंकवनीवरच भगवत कार्य व हवन कार्य होत असते . जर कुनी म्हणत असेल कि ईतर संस्था व मंडळच्या फोटोला नमस्कार केल्याने दुःख येतात तर त्या सांगनाऱ्या सारख महाबुद्धिमान सेवकच नाहि.
बांधवानो जो पर्यत तुम्हि या शिकवनीला समजुन समजनार नाहि ह्या मानव धर्माचा व या शिकवनीचा अर्थ काढुन आपल्या जिवनात अंगिकृत करनार नाहि तो पर्यंत हे जेष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी तुम्हाला भावा भावाचा वैरी बनवतील व ज्या दिवसी असा राग चढला तर या मानव धर्माचा पुढे काहि सांगता येनार नाहि.
बांधवानो आपल्याला नातलग, परिवार यांच्यासी नात टिकवायचे आहे म्हणुन त्यांच्या कार्यक्रमात हजर राहता येते आणि ज्या बाबांनी आपल्याला भगवंताचे गुण दाखवुन खरा कृपा फुकटात वाटुन दिला, दुःखातुन सुखी केला, समाजात एक चांगला स्थान दिला ईत्यादि त्या भगवंताच्या कार्यक्रमात नको जा हे मात्र माझ्या डोक्या बाहेरच आहे.
------------------------------------------
मला हे कळत नाही की, सेवकावर असा विषय ठेवण्याची वेळच का? बर आली असेल
आली तर आली विषय खुप महत्वाचा आहे आणि काळाची गरज आहे, व्हाट्स आप वर मानव धर्माचे 100 ग्रुप असतील , पण हा मुद्धा कोणत्याच ग्रुप वर झाला नसावं अस मला वाटते
************
खरच प्रश्न ज्वलनंत आहे आणि काळाची गरज आहे
बाबानी जो मानव धर्म ज्या स्वरूपात स्थापन केला होता ते स्वरूप,उद्देश कुठंतरी लोप पावत चालले आहे असे चित्र आपल्याला सर्वकडे पाहायला मिळते ,खरच सेवकानो विचार करा आपल्या बुद्धीवर जोर द्या आपल्याला बाबा काय म्हणत असतील,मी सेवकांना का म्हणून हा मार्ग दाखविला आणि सेवकांनी माझ्या मार्गाचे काय करून ठेवले
बाबांना वाटत असेल की, मी जर ही कृपा स्वतः पुरती मर्यादित ठेवली असती तर चांगलं झालं असते, पण त्याच क्षणी आपला दुःखी कष्टी समाज बाबांच्या डोळ्या समोर येत असेल तेव्हा बाबांना वाटत असेल की नाही, चांगलं झालं मी ही कृपा दुःखी मानवाला वाटून दिली तर, माझा दुःखी समाज तर सुखी झाला
पण आज खरच विदारक दृश्य आहे आज भाऊ भावाचा नाही,बाप मुलाचा नाही,जावई सासर्याचा नाही असे चित्र आज आपल्याला सर्वी कडे पाहायला मिळत आहे, आधी आपण एखाद्या नाविन गावात गेलो तर दरवरील पाटी पाहून नमस्कार घेऊन आपल्या सेवकांची ओळख होत होती
आता चित्र असे आहे की, आधी विचारतात तुमचे कार्य कुठून आहेत, हे चित्र चहूकडे काही वर्षात आपल्याला पाहायला मिळत आहेत
डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि त्या विषयी कलमा लिहून दिलेल्या आहेत कलम 19 A अँड 19 B यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक वेक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे आणि यावर कोणताही भारताचा नागरिक बंधने घालू शकत नाही
आणि याच उल्लंघन जर कोणी करत असेल आणि कोणावर जर धर्मा बाबत जबरजस्ती करीत असेल तर त्यात कठोर करवाहीचे निर्देश बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेले आहे
म्हणून प्रत्येक वेक्तीला धर्म स्वतंत्र आहे, कोणताही वेक्ती भारतात कोणताही धर्म घेऊ शकतो त्याला घटनेने दिलेला अधिकार आहे
आता तुम्ही म्हणाल की , हा वकिलकी करत आहे तर जास्तच ज्ञान वाटत आहे म्हणून पण एकदा राज्य घटनेचा अभ्यास करा तेव्हा आपणास सर्व काही समजून येईल
त्यानुसार आपण वागलं पाहिजे, जर आपल्यावर कोणी वेक्ती जर दडपण आणत असेल तर ही बाब चुकीची आहे,
आणि आपल्या। मानव धर्माचा विचार जर केला तर महान त्यागी बाबा जुमदेवजी नि आपल्या साठी पण एक घटना लिहून ठेवलेली आहे आणि त्यात अनेक नियम दिलेले आहेत
ती घटना म्हणजेच आपली नियमावली, खरच आपण बाबांच्या नियमाचे पालन करतो का?
कारण बाबानी सर्व विश्वाचा,समाजाचा,समोर काय होईल या सर्व बाबीचा अभ्यास करून ही नियमावली तयार केलेली आहे याच पालन करणे प्रत्येक सेवकांचा काम आहे
आणि बाबानी दिलेल्या नियमच/घटनेचे पालन केले नाही तर आपण दोषी होऊ परमेश्वर आपणास माफ करणार नाही हे तितकंच सत्य आहे, सेवकांनी स्वतःचा आत्मा जागृत करण्याची वेळ आलेली आहे आणि ती शक्ती बाबानी प्रत्येक सेवकाला सारख्या प्रमाणात दिलेली आहे, ही कृपा वाटून देतांनी बाबानी जातीभेद, धर्म भेद केला नाही, सर्वाना सारख्या प्रमाणात ही कृपा वाटून दिली व या दैवी शक्तीचा वापर सेवक आपल्या मानव धर्मासाठी, आपल्या समाजासाठी कश्या प्रकारे करतो हे त्या सेवकावर अवलंबून आहे
आज आपण बघतो अनेक गावी सेवक संमेलने होतात त्यात बाबांच्या शिकवणीवर कमी मार्गदर्शन होतो आणि सेवकात/गावात फूट पडण्याचे मार्गदर्शन अधिक होताना दिसतात बाबानी आपणास अशीच शिक्षण दिल आहे काय? नाही
बाबांची शिकवण ही सर्व समावेशक होती, बाबा सर्वाना आपले लेकरं समजत हॊते बाबानी कधीही भेदभाव केला नाही. सेवक कोणत्याही मंडळ चे किंवा संस्थेचे कार्य करणारा नसावा तर सेवक हा बाबांच्या नियमाने चालणारा असावा, आपण कोणत्याही संथा किंवा मंडळ चे सभासद फी भरून सभासद होऊ शकतो, पण सेवक फक्त मानव धर्माचे असतो हे सेवकांनी जीवनभर विसरू नये
!!बाबांचं मार्गदर्शन!!
एक सून आपल्या सासुच खुप छळ करत होती (सत्य घटना आहे) ती आपल्या सासूला बरोबर जेवायला देत नव्हती तीच एक पण काम करीत नव्हती खूपच छळ करायची, एक दिवस त्या गावात बाबांचा दौरा झाला आणि ही गोस्ट बाबांना कळली तेव्हा बाबानी त्या सूनबाईला जवळ बोलावलं आणि म्हणाले बाई जर तुझ्या मुलाने तुझ्या मांडीवर संडास केली तर तू आपली मांडी कापून फेकसिल का? असा प्रश्न बाबानी आपल्याला का? बरं केला असावा हा विचार त्या सुनेच्या मनात आला पण काही वेळाने तिला कळाले की बाबांनी आपल्याला अस का? बरं बोलले म्हणून, तेव्हा ती सुनबाई आपल्या घरी आली आणि त्या क्षणा पासुन तिने आपल्या सासूची सेवा आपल्या आई सारखी केली आणि मरे परेनंत आपल्या सासू सोबत मुली सारखी ती सून वागली
ही आपल्या महान त्यागी बाबा जुमदेव जीची शिकवण होती बाबानी केव्हाच सेवकांना तोडलं नाही, आणि बाबा जर हयात असते तर अस झालं पण नसते
आज मार्गात असून भाऊ भावाला घरी बोलावत नाही, फारच विचारांची बाब आहे , बाबा आपल्याला पाहत असतील तर काय म्हणत असणार, मी सेवकांना काय शिकवन दिली आणि सेवक एका परमेश्वराच्या हवणात सुद्धा जात नाही, तेव्हा बाबांना काय वाटत असेल
बोलत नाही ते ठीक आहे पण परमेश्वराच्या हवणात सुद्धा यायला जायला मनाई हे जरा जास्तच होत आहे
कारण सर्वांची विनंती,प्रार्थना,नियम सारखेच तरी एवढा विरोध का? बरं आहे आपल्या सेवकात
हे सर्व एकाच गोष्टी साठी होत आहे आणि ती गोस्ट म्हणजे खुर्ची पद मान प्रतिष्ठा
सर्व संथा मंडळ एकच विनंती प्रार्थना करतात तर मग आपण का, बर भेदभाव करतो, आज आपण सेवकांना धमकी देतो, तू त्याच्या घरी हवणाला जाजो नोको नाहीतर तुझे कार्य बंद करिन अशी धमकी, मार्गदर्शक सेवकांना देत आहे, हीच बाबांची शिकवण आहे काय?
पण सेवकांना घाबरण्याची काहीही गरज नाही, एकाने कार्ये नाही दिले म्हणून का दुसरे कार्ये देणार नाही काय, दुसरी कडून कार्ये घ्याच, पण आपल्या गोष्टीवर ठाम राहायचं तोच बाबांचा सच्चा सेवक
आजचा सेवक बाबांची शिकवण बाजूला ठेऊन आपली शिकवण शेवकांना सांगू पाहत आहे आणि असे बाबांच्या नियमात फेरफार करीत आहे आणि आपले हातचेच नियम लावून सांगतात
आता मला सांगा दादा ज्या बाबानी या मार्गाची स्थापना केली, त्यांचे नियम चूक कसे असू शकतात, थोडं विचार करा दादा,
पण आजचा सेवक हा सुज्ञ आहे त्याला सर्व काही समजते कळते पण वळत नाही ही पण तेवढीच शोकांतिका आहे
म्हणून सेवकानो आता तरी जागृत व्हा आणि सत्य काय आहे हे ओळखा
आपण मानवाला घाबरू नका फक्त त्या एका परमेश्वराला मनन चिंतन करा आणि आपली आत्मा जागृत करा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनवा
नमस्कार जी
सौजन्य:परमात्मा एक सेवा समिती
Bahut badhiya Sewak Dada aapane acche Vishay per margdarshan Kiya Taki ki isase Sabhi Sewak samajh sake namaskar ji
उत्तर द्याहटवा